सहंनी राष्ट्रवादाच्या अभ्यासाची जी वाट घालून दिली, ती अत्यंत मोलाची आहे...
सहंच्या विचारसृष्टीतदेखील आपला देश आणि त्याचे भवितव्य हा विषय केंद्रस्थानी होता. शिकवणे आणि शिकणे ही त्यांची एक सहज वृत्तीच बनून गेली होती. केवळ वर्गात, ग्रंथालयातच नव्हे; तर समाजात मिसळून. साहित्य, संगीतादी कलांमध्ये त्यांना रुची होती. त्यांच्या रसिकतेचे आणि या क्षेत्राविषयीच्या त्यांच्या जाणकारीचे कवडसे सहंच्या लिखाणात दिसतात.......